“शिवेसना बाळासाहेबांना चुकीचे ठरवत आहे का ?”

“शिवेसना बाळासाहेबांना चुकीचे ठरवत आहे का ?”

मुंबई – आणिबाणीच्या काळात ज्यांना अटक करुन तुरुंगात टाण्यात आलं होतं. त्यांना राज्य सरकारतर्फे पेन्शन देण्यात येणार आहे. प्रत्येकाला प्रति महिना 10 हजार रुपये पेन्शन दिलं जाणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची यावर काय भूमिका आहे असा सवाल राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या निर्णयावर शिवसेनेनं अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आणिबाणीचं समर्थन केलं होतं. मग या निर्णयाला शिवसेनेची संमती आहे का ?  असं करुन शिवसेना बाळासाहेबांना चुकीचं ठरवत आहे का ? असा सवालही मलिक यांनी केला आहे.

यावर आता शिवसेना काय भूमिका घेते ते पहावं लागेल. दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पेन्शन योजना नाकारली आहे. राष्ट्रसेवा दलाचे डॉ. सुरेश खैरनार आणि समाजवादी विचारांचे कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी ही पेन्शन नाकारली आहे. इंग्रजी वृत्तपत्र मिररनं हे वृत्त दिलं आहे. अशा प्रकारे पैसे दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार येईल. त्यामुळे आम्हाला पेन्शन देण्याच्याऐवजी राज्याच्या विकासावर हे पैस खर्च करावे अशी सूचना या अशा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

COMMENTS