‘या’ सात अटींवर शिवसेनेनं केली भाजपसोबत युती -सूत्र

‘या’ सात अटींवर शिवसेनेनं केली भाजपसोबत युती -सूत्र

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटी भाजपनं मान्य केल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळेच शिवसेनेनं भाजपसोबत युती केली आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार आहे, तर विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेच्या भाजपसमोरील  प्रमुख अटी

1) यामधील पहिली अट म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देण्याचं भाजपनं मान्य केलं आहे.

2) दुसरी अट विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा 50-50 फॉर्म्युला असणार आहे.

3) तिसरी अट शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही.

4) चौथी भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.

5) पाचवी अट त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.

6) सहावी अट विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करू शकते.

7) सातवी अट शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पिकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

या सर्व अटी भाजपने मान्य केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS