‘या’ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव!

‘या’ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव!

नागपूर – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीत तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याचं दिसत आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 11 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. काटोलचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर, या जागेवर भाजपचा आमदार विजयी झाल्याने, युतीत अपरिहार्याने भाजपकडे जाणाऱ्या या जागेवर शिवसेनेनं दावा केला आहे. त्यामुळे या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना -भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर डॉ. आशिष देशमुख विजयी झाले होते. परंतु, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुखांनी स्वपक्षाच्या सत्तेवर नाराज होत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काटोलची जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

परंतु या मतदारसंघातील तिढा उद्या सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून उद्या नागपुरात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एका मंचावर येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचं उद्या नागपुरात संमेलन असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या दरम्यान उद्या काटोलच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

COMMENTS