महायुतीला मोठा धक्का, या घटक पक्षातील जिल्हाध्यक्षांसह सर्व तालुकाध्यक्षांचा राजीनामा, महाआघाडीला पाठिंबा!

महायुतीला मोठा धक्का, या घटक पक्षातील जिल्हाध्यक्षांसह सर्व तालुकाध्यक्षांचा राजीनामा, महाआघाडीला पाठिंबा!

बुलढाणा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप महायुतीला जोरदार धक्का बसला आबे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांसह सर्व तालुक्याअध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बुललढाणा जिल्ह्यात शिवसेना-भाजप महायुतीला जोरदार धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान जातीयवादी पक्षासोबत आम्हाला राहायचे नाही, आम्ही सर्व सेक्युलर सोबत जाणार असल्याचा निर्णय या सर्व पदाधिकाय्रांनी घेतला आहे. तसेच महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णयही घेतला असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बुलढाण्यात महाआघाडीची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS