भाजप-शिवसेना युतीसाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार!

भाजप-शिवसेना युतीसाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार!

नवी दिल्ली – भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचालींना आता वेग आला असल्याचं दिसत आहे.
शिवसेनेसोबतचा तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आणि समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर यावेत असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर मांडला असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या प्रयत्नांनंतर शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हेपाहणं गरजेचं आहे.

COMMENTS