विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युतीचा पहिला उमेदवार घोषित ?

विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युतीचा पहिला उमेदवार घोषित ?

मुंबई –  लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यानच विधानसभेतही शिवसेना-भाजपची युती ठरली असल्यामुळे आता उमेदवारांची औपचारीक घोषणा होण बाकी आहे. त्यअशातच भाजप-शिवसेना युतीचा राज्यातील पहिला उमेदवार जवळपास घोषित झाला असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विधानसभेलाठी युतीचा पहिला उमेदवार म्हणून कोल्हापुरातील विक्रमसिंह घाटगेंचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत.

दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कागल साखर कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचं अनावर केलं. यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विक्रमसिंह घाटगेंचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांना काम करत राहण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नाही तर ज्या सभागृहात आपल्याला काम करण्याची इच्छा आहे, त्यासाठी देखील जनता आशीर्वाद देईल असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना म्हटलं आहे. त्यामुळे य मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या समरजितसिंह घाटगे यांची विधानसभेसाठी उमेदवारीच घोषित केली असल्याचं दिसत आहे.

समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षांपासूनच विधानसभेसाठी तयारी केली आहे. तसेच त्यांच्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सकारात्मक आहे. त्यामुळे दादांच्या शिफारशीवरुन थेट मुख्यमंत्र्यांनी समरजितसिंह यांना युतीचा उमेदवार म्हणून घोषित केलं असल्याची चर्चा आहे.

COMMENTS