फडणवीस, उद्धव ठाकरेंमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरलं, चंद्रकांत पाटलांनी सांगितला फॉर्म्युला !

फडणवीस, उद्धव ठाकरेंमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरलं, चंद्रकांत पाटलांनी सांगितला फॉर्म्युला !

पुणे – भाजपचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? असा सवाल केला असता मग काय सोडणार काय? असं उत्तर त्यांनी दिलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे लोक ठरवतील. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असंही ते म्हणाले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला  40 टक्के मतदारांनी शरद पवार यांना नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. हाऊस फुल्लचा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्यांकडे स्वतःची 10 तिकिटे असतात असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने ठरवलं तर हात वर करून आवाजी मतदानाला ही भाजप तयार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. मतपत्रिकेवरही लढू, कशावरही लढलो तरी आम्हीच निवडणूक जिंकू असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाचं सूत्र ठरलं असून 50-50 असं होणार आहे. शक्यतो विनिंग  सिटिंग बदलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

COMMENTS