भाजप-शिवसेनेच्या चढाओढीत मतदारांची दिवाळी ! VIDEO

भाजप-शिवसेनेच्या चढाओढीत मतदारांची दिवाळी ! VIDEO

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावरही शिवसेना – भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीयेत. एकाच मतदारसंघातल्या दोन आमदारांमध्ये महागाईने त्रस्त जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी चढाओढ लागलीय. मागाठाणे मतदरसंघातील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी सरकारला लक्ष करण्यासाठी पाच रुपयात दोन किलो साखर वाटप सुरू केले.

तर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट 2 किलो मोफत साखर वाटपाचे बॅनर मतदारसंघात झळकवले. त्यामुळे सेना भाजपच्या भांडणात कायम होरपळणाऱ्या जनतेला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मात्र दिलासा मिळताना दिसतोय.

COMMENTS