शिवसेना भाजपला देणार धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता करणार पक्षात प्रवेश?

शिवसेना भाजपला देणार धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता करणार पक्षात प्रवेश?

मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर गेली काही वर्षांपासून एकत्र असलेली शिवसेना-भाजप आता आमनेसामने आले आहेत. शिवसेनेच कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीआधी भाजपने पक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिवसेनाही भाजपवर पलटवार करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षात नाराज आहेत. त्यामुळे खडसे हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान पक्षावर नाराज असलेल्या खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जाहीर टीका केली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप खडसे यांनी केला. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका मांडल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं. भाजपमध्ये वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली असं शेंडगे म्हणाले.

त्यामुळे नाराज असलेल्या खडसे यांना शिवसेनेनं पक्षात घेता येऊ शकतं का, याबाबत चाचपणी सुरू केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला शह देण्याची संधी शिवसेना सोडणार नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS