भाजपला धक्का, ‘या’ बंडखोर नेत्यानं दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज !

भाजपला धक्का, ‘या’ बंडखोर नेत्यानं दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज !

नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसला असून नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या मी भाजपमध्ये आहे, पक्षाने एबी फॉर्म दिला तर पक्षाकडून निवडणूक लढवेन, नाही तर वाट बघून अपक्ष दावेदारी करणार असल्याचा निर्धार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.शिवसेना-भाजपची युती होणार नाही हे गृहीत धरुन माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र शिवेसना-भाजपची युती झाल्याने कोकाटे यांना मोठा धक्का बसला.

दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.
आज मुहूर्तावर मी अर्ज भरला आहे. अपक्ष आणि भाजपकडून मी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने माझ्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे सध्या भाजपमध्येच आहे. 9 एप्रिलपर्यंत मला भाजपने एबी फॉर्म दिला नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS