राज्यातील भाजप-शिवसेना युती तुटल्याचे ‘या’ महापालिकेत पडसाद, भाजपच्या उपमहापौरांचा राजीनामा!

राज्यातील भाजप-शिवसेना युती तुटल्याचे ‘या’ महापालिकेत पडसाद, भाजपच्या उपमहापौरांचा राजीनामा!

औरंगाबाद – शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना, भाजपची युती तुटल्याचे पडसाद औरंगाबाद महापालिकेत उमटले आहेत. औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील युती तुटल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तसेच भाजपच्या 22 नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठा पटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवरही आता शिवसेना-भाजपमध्ये फूट पडत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या महापालिकेत जवळपास 27 वर्षांपासून भाजप-शिवसेना एकत्र होते. परंतु युती तुटल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी आता काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे. मागील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र न बसता वेगवेगळे बसले होते. त्यामुळे पालिकेतही शिवसेना-भाजप वेगळे होणार असल्याची चर्चा होती. परंतु आज उपमहापौरांनी दिलेला राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

COMMENTS