युतीत तणाव, भाजपनंतर उद्धव ठाकरेंनीही बोलावली शिवसेना मंत्र्यांची बैठक !

युतीत तणाव, भाजपनंतर उद्धव ठाकरेंनीही बोलावली शिवसेना मंत्र्यांची बैठक !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीत तणाव वाढला असून दोन्ही पक्षांनी बैठक बोलावली आहे. एका बाजूला भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक सुरू आहे. तर दुसय्रा बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. सेना भवनावर ही बैठक सुरु आहे. युतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा हाेणार आहे.

दरम्यान शिवसेना भाजपत फॉर्म्युलावर सहमती होत नाही. तसेच भाजपचा फॉर्म्युला शिवसेनेने फेटाळला आहे. त्यामुळे युतीतला तणाव चांगलाच वाढला आहे.शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळल्याने या पार्श्वभूमीवर आता भाजपचे बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासहल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २२ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. त्यावेळी युतीबाबत भाष्य होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना जास्त जागांवर अडून राहिली तर युती होणार नसल्याची चर्चा आहे.

COMMENTS