…तर मुख्यमंत्र्यांसह नागपुरातील सहाही जागा पाडण्याचा शिवसेनेचा इशारा?

…तर मुख्यमंत्र्यांसह नागपुरातील सहाही जागा पाडण्याचा शिवसेनेचा इशारा?

नागपूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. कारण नागपूरमधील सहापैकी दोन जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे. पूर्व आणि दक्षिण नागपूर या भाजपकडे असलेल्या दोन जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा आहे. त्यामुळे दबाव निर्माण करुन नागपुरातील सहापैकी दोन जागा मिळवण्याचा सेनेचा हा डाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन जागा मिळाल्या नाहीत, तर सहाही जागा पाडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच शिवसेनेनं भाजपला दिला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजपनंही शिनसेनेला त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपचे 111 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे अवघे दोन नगरसेवक आहे. नागपूर शहरात सहापैकी सहाही आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या, त्या जागांवर भाजप मागे हटणार नाही, शिवसेनेने खोट्या आत्मविश्वासात राहू नये असं भाजपचे शहराध्यक्ष प्रविण दटके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागपुरातील जागांवरु शिवसेना भाजपतील वाद आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS