शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी घेवून झेडपीवर भगवा फडकवला, सभापती पद दिलं भाजपला !

शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी घेवून झेडपीवर भगवा फडकवला, सभापती पद दिलं भाजपला !

मुंबई – राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना-भाजप ठाणे जिल्हा परिषदेत एकत्रित आले आहेत. याठिकाणी शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी घेवून झेडपीवर भगवा फडकवला आहे. तसेच चार विषय समितीच्या सभापतींच्या निवडणूकीत शिवसेनेच्या ताब्यातील महिला व बाल कल्याण समीती सभापती पद भाजपला देवून सत्तेत सामील करुन घेतले आहे. विशेष म्हाणजे चार पैकी तीन समित्यांच्या सभापती पदावर तीन महिलांची वर्णी लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमळे शिवसेनेने भाजपाला सभापती पद देवून सत्तेत वाटा दिला असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेच्या विभाजनानंतर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेन 53 पैकी सर्वाधिक 26 जागा मिळवित जिल्हा परिषदेवर भगवा फडकविला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेवून अध्यक्ष बसविला होता. परंतु सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे शिवसेनेच्या बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे व महिला व बाल कल्याण सभापती दर्शना ठाकरे, राष्ट्रवादीचे समाजकल्याण सभापती निखील बरोरा व कृषी समिती सभापती दर्शना गुळवी यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूका पार पडल्या. यावेळी चारही विषय समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने या निवडणूका बिनविरोध झाल्या.

भिवंडी तालुक्यातील कांदळी-पडघा येथील सेनेच्या वैशाली चंदे,यांची बांधकाम व आरोग्य सभापती पदी निवड झाली. तर भाजपाच्या सपना भोईर ह्या रानाळे येथील असून त्यांची महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या डोळखांब ता. शहापूर येथील संगिता गांगड यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदी तर भिवंडीच्या अनगांव येथील किशोर जाधव यांची समाजकल्याण सभापती पदी निवड झाली आहे.

COMMENTS