सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं एक पाऊल टाकलं !

सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं एक पाऊल टाकलं !

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांकडून सत्तास्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसकडून सत्तास्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे उपस्थित होते.

दरम्यान राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं आज एक पाऊल टाकलं आहे. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय-धोरण आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला. तसेच समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. तसेच शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा मसुदा तयार करण्यात आला असून, लवकरच तो काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.तसेच राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळं सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी लवकर निर्णय घेतला, तर लवकरच सत्ता स्थापन करण्यात काहीही अडचण येणार नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

COMMENTS