शिवेसना इंधन दरवाढीच्या तर भाजप वीज बिलाच्याविरोधात रस्त्यावर

शिवेसना इंधन दरवाढीच्या तर भाजप वीज बिलाच्याविरोधात रस्त्यावर

मुंबईत – एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. भाजप आणि शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली.

केंद्रसरकार हाय हाय ,मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोरोना संकटातून सामान्य नागरिक अद्यापही सावरला नाही. सर्वसामान्यांची जगण्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे. बेरोजगारी पराकोटीची वाढली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना पुन्हा सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी महागाई गगनाला भिडलेली असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

राज्यात विविध महावितरण कार्यालयाच्या बाहेर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी जनतेला वाढीव वीजबिलाचा नाहक त्रास देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तब्बल ४ कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या ठाकरे सरकारला आता विजेचे जोरदार झटके दिल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS