शिवसेना-भाजपचं असंच सुरु राहिलं तर राज्यात पुढे काय होऊ शकेल ?

शिवसेना-भाजपचं असंच सुरु राहिलं तर राज्यात पुढे काय होऊ शकेल ?

मुंबई – मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना- भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. तर भाजप मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी नाही. त्यामुळे राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर काय होऊ शकते याबाबतची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.

1) 9 नोव्हेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झाला नाही तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही.

2) 9 नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतील.

3) संबंधित पक्षाकडून मुख्यमंत्री शपथ घेतील.

4) नव्या मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल मुदत देतील.

5) मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि इतर कुठलाही पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे आला नाही तर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतील. तोपर्यंत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीही रखडेल.

6) जर पुढच्या आठवड्यात भाजपाने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तात्काळ आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांचे अधिवेशन बोलवले जाईल.

7) या अधिवेशनातच नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल.

8) शिवसेनेसह शपथ झाली तर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची गरज पडणार नाही.

भाजपच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा
मुहूर्त ठरला ?

भाजपच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा
मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ होणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेनासोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे तयारीची जबाबदारी देण्यात आली असून 2014 प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भाजपाची तयारी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. हा शपथविधी समारंभही भव्य दिव्य करण्याची तयारी सुरु असून 2014 साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती.
यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

COMMENTS