शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला मिळणार थेट कॅबिनेट मंत्रीपद ?

शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला मिळणार थेट कॅबिनेट मंत्रीपद ?

मुंबई – प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमधील हालचाली वाढल्या असल्याचं दिसत आहे. याबात काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांकडे चाचपणी केली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास सुभाष देसाई यांचं नाव आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आलेले बीडमधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची थेट कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान यापूर्वी शिवसेना तीन महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रीपद घेणार नसल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आता शिवसेना सहा महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रीपद घेणार का हे पाहण गरजेचं आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.

COMMENTS