नांदेड  महापालिकेनंतर ठाणे झेडपी पॅटर्नही यशस्वी,  लोकसभा, विधानसभेलाही होऊ शकतो असा छुपा पॅटर्न ?

नांदेड  महापालिकेनंतर ठाणे झेडपी पॅटर्नही यशस्वी,  लोकसभा, विधानसभेलाही होऊ शकतो असा छुपा पॅटर्न ?

ठाणे – ठाणे जिल्ह्यात भाजपने गेल्या काही महिन्यात सलग दुस-यांदा सपाटून मार खाल्ला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तर शिवसेना दुस-या क्रमांकवर आणि भाजप थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला. त्याचीच पुनरावृत्ती दोन दिवसांपूर्वी झाली. ठाणे झेडपी निवडणुकीत भाजपनं जंगजंग पछाडूनही सत्तेचं स्वप्न हवेतच विरली. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काग्रेसच्या मदतीनं झेडपीवर आपला झेंडा फडकावला. 53 जागा असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेला 26 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10, तर काँग्रेसला 1 आणि भाजपला 14 जागा मिळाल्या. आता झेडपीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं उघडपणे नाही छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केले होती. तिथेही सत्तेची स्वप्न पाहणा-या भाजपाला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता.

नांदेड महापालिका निवडणुकीनंतर ठाणे झेडपीमध्ये यशस्वी झालेला पॅटर्न आता विधानसभा आणि लोकसभेलाही वापरला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चीली जात आहे. उघडपणे शिवसेनेला काँगेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाणं परवडणारं नाही. कारण तसं केलं तर हिंदुत्ववादी मते शिवेसनेकडून दूर जाऊ शकतात आणि त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. तीच स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. त्यांनाही शिवसेनेसोबत उघडपणे जाणं अडचणीचं आहे. त्यांच्या मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो आणि राष्ट्रय पातळीवर विचार करता काँग्रेसला शिवसेनेसोबतची युती परवडणारी नाही. त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी अंतर्गत समझोते करुन भाजपला अडचणीत आणू शकतात. जिथे जिथे भाजप नगण्य असेल अशा ठिकाणी तगडी कुस्ती खेळून जिंकणे आणि जिथे भाजप तगडा आहे तिथे तीन पक्षांपैकी ज्याची ताकद चांगली आहे. त्याला अंतर्गत मदत करुन भाजपला हरण्याचे डावपेच आखले जाऊ शकतात.

नांदेड आणि ठाण्यातील अंतर्गत आणि छुप्या युतीचा अभ्यास केल्यानंतर अशी छुपी युती अस्तित्वात येईल असं म्हणायला जागा आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर यासंदर्भात मत मांडलं आहे. त्या नेत्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर आमचे लोकसभेत फक्त 4 ते 5 जागा निवडूण आल्या तरी चालतील. मात्र आम्ही लोकसभेला भाजपचे 16 उमेदवार पाडू शकतो एवढी आमची ताकद आहे. यावरुन शिवसेनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी अशी रणनिती आखली असण्याची शक्यता आहे. सध्याच्या राज्याच्या राजकारणत भाजप हा तिनही पक्षांचा शस्त्रू आहे. त्यामुळे शस्त्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने अशी छुप्या आघाडीची शक्यता आगामी लोकसभा आणि विधानसभेला पहायला मिळू शकते.

COMMENTS