शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं अखेर ठरलं, ‘हा’ आहे नवा फॉर्म्युला ?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं अखेर ठरलं, ‘हा’ आहे नवा फॉर्म्युला ?

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रित येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याचं दिसत आहे. काल झालेल्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समन्वय बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे. तसेच राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन अडलेल्या शिवसेनेचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सरकार स्थापनेसाठी तिन्ही पक्षांमध्ये नवा फॉर्म्युला ठरला असून 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरल्याची माहिती आहे. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच असणार आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह 14 आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदे मिळण्याचे शक्यता आहे. तसेच महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS