लोकसभेसाठी उदयनराजेंना शिवसेनेचं आव्हान, दिवाकर रावतेंचं सूचक वक्तव्य !

लोकसभेसाठी उदयनराजेंना शिवसेनेचं आव्हान, दिवाकर रावतेंचं सूचक वक्तव्य !

सातारा – सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना शिवसेनेनं आव्हान दिलं आहे. उदयनराजे यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, त्यांनी कोणत्याही पक्षातून लढू नये मात्र इतर पक्षातून निवडणूक लढवल्यास शिवसेना त्यांच्या विरोधात ताकदीनं लढणार असल्या वक्तव्य  शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केलं आहे.म्हटलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीचा तालुकावार आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते काल साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान उदयनराजे यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवू नये, साता-यातून त्यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत. त्यामुळे मला उदयनराजेंबद्दल आदर आहे आणि तो प्रत्येकाला असला पाहिजे असंही यावेळी दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उदयनराजेंनी रोष्ट्रवादीतून निवडणूक लढवली तर याठिकाणी शिवसेना त्यांना आव्हान देणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS