महायुतीला धक्का, शिवसेनेच्या 28 नगरसेवकांचा राजीनामा!

महायुतीला धक्का, शिवसेनेच्या 28 नगरसेवकांचा राजीनामा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या बंडखोर नेत्यासह 28 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ही फूट पडली असून शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतुन त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मागील निवडणुकीत गणपत गायकवाड हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होेेते. त्यावेळी त्यांनी 777 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत मात्र गणपत गायकवाड यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

COMMENTS