शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची अलोट गर्दी !

शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची अलोट गर्दी !

मुंबई – शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आज सायंकाळी शिवाजी पार्कवर पार पडतोय. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क सज्ज झालंय. थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार असून याठिकाणी राज्यभरातून हजारो शिवसैनिक आले आहेत.या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीआधी हा मेळावा होत असल्याने राजकीयदृष्ट्याही त्याला महत्व प्राप्त झालं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आगामी निवडणूका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर ते आज कोणती नवी भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे. ठाकरेंनी आपल्या अयोध्यावारीची याआधीच घोषणा केली असून आज मेळाव्यात ते दौ-याची तारीख जाहीर करतील. भाषणात कडवट हिंदुत्वाचा नारा देताना, मोदी- फडणवीस सरकारच्या धोरणांवर ठाकरे टीका करणे अपेक्षित मानलं जातंय. यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षाचे नेते-कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीआधी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

COMMENTS