“शिवसेनेच्या ‘त्या’ 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा !’

“शिवसेनेच्या ‘त्या’ 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा !’

मुंबई – शिवसेनेचे माजी आमदार आणि एकेकाळी कट्टर राणे समर्थक असलेले सिंधुदर्गातील शंकर कांबळी यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केला आहे. माझं राजकीय अस्तित्व नारायण राणे यांनी संपवलं असून मी शिवसेना सोडून मूर्खपणा केला. त्यावेळी नारायण राणेंना वाटायला लागलं खरी शिवसेनेची ताकद मीच. मी पक्ष हाताळणार. त्यावेळी राणेंचे मनसुबे उधळून लावले. तरीही राणेंनी 21 आमदार फोडले. त्या 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा झाला अशी खंत शंकर कांबळी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यानशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना सर्वोच्च मुख्यमंत्रिपद दिलं. मात्र त्यांच्याशी गद्दारी करत राणे सेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसवासी झाले. परंतु त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा सर्वांवरच टीका केली. तसेच ‘आपण स्वाभिमानी पक्ष स्थापन करुन या पक्षात जिथे दोघे मुलगे नेतील तिथे नारायण राणे जातात. आज जी चूक मी केली, ती कोणीही करु नये. असंही कांबळी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS