बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेचं नवं धोरण, “एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष !”

बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेचं नवं धोरण, “एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष !”

मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेतील वार्षिक वैधानिक समितीची निवडणूक येत्या 5 एप्रिलरोजी पार पडणार आहे. स्थायी आणि शिक्षण समितीसाठी ही निवडणूक घेण्यात येणार असून यासाठी आज अर्ज भरण्यात आले आहेत. महापालिकेत सर्व नगरसेवकांना  न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं “एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष” असं नवं धोरण आखलं आहे. शिवसेनेकडून समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी खालील नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत.

1) स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांच्याजागी यशवंत जाधव अर्ज भरणार आहेत.

2) सुधार समिती अध्यक्षपदी बाळा नर यांच्याजागी दिलीप लांडे अर्ज भरणार आहेत.

3) बेस्ट समिती अध्यक्षपदी अनिल कोकीळ यांच्याजागी आशिष चेंबूरकर अर्ज भरणार

4) शिक्षण समिती अध्यक्षपदी शुभदा गुडेकर यांच्या जागी मंगेश सातमकर अर्ज भरणार आहेत.

दरम्यान स्थायी समिती अध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर सभागृह नेत्याची निवड होणार आहे. दरम्यान २०१९ च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन मुंबई महापालिकेत चांगली कामगिरी करणं हे शिवसेनेचं लक्ष्य आहे. यासाठी महापालिका निवडणुकीनंतर आता दुस-या टप्प्यात चांगल्या अनुभवी नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. मनसतूने शिवसेनेत स्वत:सह ६ नगरसेवक घेवून आलेल्या दिलीप लांडेंना सुधार समिती अध्यक्षपद देत आश्वासनपूर्ती केली आहे तर, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर या आधी डावलल्या गेलेल्या महत्त्वाच्या अनुभवी नगरसेवकांनाही बेस्ट आणि शिक्षण समितीचं अध्यक्षपद देण्याचं ठरवण्यात आलं असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS