नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का, या नेत्यांनी केला भाजपात प्रवेश!

नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का, या नेत्यांनी केला भाजपात प्रवेश!

कणकवली – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु तरीही अनेक नेते पक्ष सोडून दुसय्रा पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपचे उमेदवार असलेल्या नितेश राणे यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे. शिरवल गावातील शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश घेण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून हा आपण निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे या युवा नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पोच जनतेला मिळू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या प्रवेश कर्त्या शिवसैनिकांनी सांगितले आहे.

दरम्यान भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिरवल हेळे सकल वाडी येथील संजीत ताम्हानेकर,प्रवीण सावंत,लक्ष्मण पाताडे, नरेश राऊळ, राकेश नाईक, आदी प्रमुख शिवसैनिकांसमवेत ग्रामस्थांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटा सावंत, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, पंढरी शिरवलकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

COMMENTS