शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश !

शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आज भाजपने शिवसेनेलाच धक्का दिला असून शिवसेनेचे नेते आणि सिध्दिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मयेकर यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.देवगड येथील भाजप बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे.

यावेळी भाजपचे संघटन मंत्री सतिश धोंड, माजी आमदार अजित गोगटे, संदेश पारकर, अतुल रावराणे उपस्थित होते.

दरम्यान ‘स्वाभिमानी’च्या मनिषा नलावडे-पाटील यांनी देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपची ताकद वाढली असून शिवसेनेचाच नेता भाजपमध्ये गेल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

COMMENTS