औरंगाबादमध्ये शिवसेना नेत्यानं मराठा आंदोलकाला लाथाडलं ?

औरंगाबादमध्ये शिवसेना नेत्यानं मराठा आंदोलकाला लाथाडलं ?

औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्रात आज बंद पाळण्यात आला. राज्यातील अनेक ठिकाणी हिंसक वळण आलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. आंदोलकांनी काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड, आणि जाळपोळही केली असल्याची माहिती आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एका आंदोलकांला लाथाडलं असल्याची माहिती आहे.

रावसाहेब दानवे यांनी देखील या घटनेबाबत  समर्थन दिलं असून या आंदोलकानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खालच्या पातळीत शिव्या दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या नेत्याला जर कोणी खालच्या पातळीवर शिव्या देत असेल तर मी ऐकूण घेऊन शकत नाही. अन्यथा माझा त्या पदावर राहण्याला अर्थच उरणार नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. याबाबतची बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनेनं दिली आहे.

COMMENTS