शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!

शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!

रत्नागिरी – शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण दापोलीचे माजी आमदार सुर्यकांत दळवी हे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत
दळवींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
रात्री उशिरा रत्नागिरीत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून शिवसेना पक्षाने दखलच घेतली नाही तर मात्र मला निर्णय घेणं भाग पडेल असा इशारा दळवी यांनी दिला आहे. तसेच निर्णय घ्यायची वेळ आलीच, तर भाजपमध्ये जाईन असं स्पष्टीकरणही दळवी यांनी दिलं आहे.

दरम्यान शिवसेना-भाजपमधील युतीचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे युती झाली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार दळवी भाजपमध्ये गेल्यास याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. दापोलीमध्ये सुर्यकांत दळवींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ते कुणाला मदत करणार यावर दापोलीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

COMMENTS