शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट,उदयनराजेंविरोधात लढणार?

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट,उदयनराजेंविरोधात लढणार?

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आज सकाळी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेच नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत ही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सातारा लोकसभा निवडणूक
नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 4 लाखाहून अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी नरेंद्र पाटील यांच्याकडून केली जात नाही ना असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. परंतु पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पुन्हा आव्हान देण्याचं वृत्त नरेंद्र पाटलांनी फेटाळलं आहे. साताऱ्यातील जनतेला परिवर्तन हवं होतं. तसेच साताऱ्यात अद्याप बराच विकास होणे गरजेचे आहे. अजून पोटनिवडणुका जाहीर होणे बाकी आहे. त्या जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित बसून याबाबतचा निर्णय घेतील आणि साताऱ्यात पोटनिवडणूक लढवणार हे ठरवतील असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS