शिवसेनेला धक्का, ज्येष्ठ नेता काँग्रेसच्या वाटेवर?

शिवसेनेला धक्का, ज्येष्ठ नेता काँग्रेसच्या वाटेवर?

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेना नेते अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. खोतकर यांनी आज काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली आहे. औरंगाबादच्या सातारा परिसरात या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर गुुुुप्त चर्चा झाली.

दरम्यान या भेटीनंतर  दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गूडन्यूज मिळेल, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला. त्यामुळे अर्जुन खोतकर हे काँग्रेसमधून जालना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS