शिवसेनेच्या भाजपाकडे तीन मागण्या, लोकसभेतील ‘या’ पदावरही केला दावा  ?

शिवसेनेच्या भाजपाकडे तीन मागण्या, लोकसभेतील ‘या’ पदावरही केला दावा ?

नवी दिल्ली – भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) दुसरा सर्वात मोठा घटकपक्ष असल्याने भाजपाने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावे, अशी मागणी शिवसेना पक्षश्रेष्ठींनी भाजपाकडे केली आहे. त्यामुळे भाजपाने ही मागणी मान्य केल्यास लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्या असल्यामुळे यवतमाळमधील खासदार भावना गवळी यांना या पदावर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान शिवसेना पक्षश्रेष्ठींनी भाजपाकडे तीन मागण्या केल्या असल्याची माहिती आहे. यापैकी अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरी सावंत यांच्याकडे महत्त्वाचे खाते सोपवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याशिवाय शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदावरही दावा केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडे भूमिका स्पष्ट केली आहे. ‘रालोआ’तील दुसरा सर्वात घटकपक्ष असल्याने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेकडे यायला हवे”, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही या मागणीबाबत सकारात्मक आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेची ही मागणी भाजप मान्य करणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS