‘या’ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह !

‘या’ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह !

उस्मानाबाद – शिवसेनेतून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. प्रा. गायकवाड यांच्या नकारात्मकतेचा फायदा पक्षाला होणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप मेहनत घेण्याची गरज नसल्याची चर्चा करीत आहेत.
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना सुमारे अडीच लाख मतांनी पराभूत केले होते. मोदी लाटेचा फायदा प्रा. गायकवाड यांनाही झाला.

दरम्यान गायकवाड यांच्याकडून जिल्ह्यातील मतदारांना फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. परंतु, गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत खासदार प्रा. गायकवाड जिल्ह्यात कोठेच फिरकले नाहीत. शिवाय त्यांचा मोबाईलही कायमच बंद असायचा. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमातही खासदार फारसे दिसले नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूण येण्यासाठी कस्ता खाव्या लागतात, अशा चार-पाच कार्यकर्त्यांनाच खासदार निधीची कामे वाटप केल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. पाच वर्षांत भूम तालुक्यात केवळ पाचच कामांच्या मंजुऱ्या दिल्या आहेत. तर केवळ उस्मानाबाद आणि कळंब तालुक्याला झुकते माप दिले आहे.

या खासदारविरोधी नकारात्मकतेचा फायदा होणार असल्याने राष्ट्रवादीच्य गोटात प्रा. गायकवाड यांचे तिकीट निश्‍चित होणार असल्याची बाममी मिळताच उत्साह संचारला आहे. शिवसैनिकांकडूनही टक्केवारी घेऊनच कामांचे वाटप केल्याचा आरोप सेनेचे कार्यकर्ते करीत असून तेही प्रा. गायकवाड यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जातय. पाच वर्षानंतर सेनेच्या काही कार्यकर्त्यांना मंगळवारी (ता. पाच) खासदारांच्या गोटातून
‘कामाला लागा‘ असे फोन गेले. ‘टक्केवारी घेऊन कामे देताय, आता तुमचे तुम्ही बघा.‘,‘एक वेळ आम्ही नोटाला मतदान करू पण, घर जाळून कोळशाचा व्यापार करणार नाही‘, असा पवित्रा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात हा संदेश पोहचला. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांची नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. परिणामी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

COMMENTS