…तर भाजपलाच उद्ध्वस्त करू – शिवसेना मंत्री

…तर भाजपलाच उद्ध्वस्त करू – शिवसेना मंत्री

मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेनं एकला चलोची घोषणा दिल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी दरी निर्माण झाली असल्याचं दिसत आहे. अशातच आता दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरु आहे. पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर आता कोकणातील नाणार प्रकल्पावरुन या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. भाजपनं जर नाणार प्रकल्प आणल्यास त्या पक्षाला उद्ध्वस्त करू, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. झी २४ तासवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान आम्हाला सहज मंत्रीपदं मिळालेली नाहीत. आम्ही शिवसेनेत ५० पावसाळे खर्ची घातलेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं समर्थनही केलं. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोकणवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळ पडली तर भाजपला उद्ध्वस्त करु अस रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून केलं जात आहे. केंद्राने जरी नाणारला मंजुरी देण्यासाठी करार करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी कोणताही करार होऊ शकणार नाही. असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS