महाविकास आघाडीला पहिला धक्का, खातेवाटपा आधीच शिवसेनेच्या राज्यमंत्र्याचा राजीनामा !

महाविकास आघाडीला पहिला धक्का, खातेवाटपा आधीच शिवसेनेच्या राज्यमंत्र्याचा राजीनामा !

औरंगाबाद – महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला असुन खातेवाटपा आधीच शिवसेनेच्या राज्यमंत्र्यानं राजीनामा दिला आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती. परंतु ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते.अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. सत्तारांबरोबर आणखी दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS