विधिमंडळ परिसरात शिवसेनेचे आमदार आक्रमक, मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी !

विधिमंडळ परिसरात शिवसेनेचे आमदार आक्रमक, मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी !

मुंबई – विधिमंडळ परिसरात शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले असून आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे बॅनर घालून या आमदारांनी घोषणाबाजी केली आहे. तसेच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणीही या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार असून शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचं त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडावा अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा मसूदा तयार करुन विधेयक सभागृहात आणणार असल्याची माहिती आहे. मसुदा तयार करण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तो 29 नोव्हेंबर रोजी सभागृहात ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

COMMENTS