शिवसेनेच्या आमदाराची भाजपच्या बैठकीला उपस्थिती, लवकरच करणार भाजपात प्रवेश !

शिवसेनेच्या आमदाराची भाजपच्या बैठकीला उपस्थिती, लवकरच करणार भाजपात प्रवेश !

मुंबई – शिवसेनेच्या आमदारानं काल भाजपच्या बैठकीला उपस्थिती लावली असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत शिवसेनेचे लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच चिखलीकर यांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान लोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळवण्यात चिखलीकर यांची मोठी भूमिका होती. याबाबतचं कौतुकही वर्षावर झालेल्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.त्यामुळे चिखलीकर हे भाजपमध्ये जातील असा अंदाज वर्तवला जात होता. तो अंदाज अखेर खरा ठरला असल्याचं दिसत आहे. कारण आज भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे हा अदाज अखेर बळावला असून चिखलीकर लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS