शिवसेनेच्या एकाही मंत्र्यानं काम केलेलं दाखवलं तर राजीनामा देईन – शिवसेना आमदार

शिवसेनेच्या एकाही मंत्र्यानं काम केलेलं दाखवलं तर राजीनामा देईन – शिवसेना आमदार

नागपूर – शिवसेनेचा 12 पैकी एकही मंत्री कोणतेही काम करत नसून या मंत्र्यांच्या काळात शिवसेना खालावत गेली असल्याची खदखद शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. तसेत भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही. अनेक मंत्र्यांनी वेळ देऊनही ते प्रचाराला आले नाहीत. हे मंत्री इतर ठिकाणी सोडा पण स्वत:च्या मतदारसंघातही काम करत नाहीत. तसेच या मंत्र्यांनी केलेलं काम दाखवलंत तर मी आमदारकाची राजीनामा देईन असंही यावेळी धानोरकर यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये शिवसेनेच्या पूर्व विदर्भ मेळाव्यात बोलत होते.

 दरम्यान शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील झाले असल्याचा गंभीर आरोपही बाळू धानोरकर यांनी केला आहे. तसेच विदर्भाच्या शिवसैनिकांचा मुंबईतल्या शिवसेना भवनात योग्य सन्मान होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धानोरकरांच्या या वक्तव्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS