शिवसेना विधानसभा मुख्य प्रतोद आणि विधीमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्यांची निवड !

शिवसेना विधानसभा मुख्य प्रतोद आणि विधीमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्यांची निवड !

मुंबई – शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर
शिवसेना विधानसभा मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव मांडला. शिवसेना भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर शिक्कामाेर्तब करण्यात आले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार 105 आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ नेतेपदी निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

तसेच काल राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात आली आहे. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला , नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड , धनंजय मुंडे , हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिलं.

COMMENTS