उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला देणार शपथ!

उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला देणार शपथ!

मुंबई – सत्तास्थापनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. कोण सत्ता स्थापन करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे.
‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक होत असून या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुन प्रत्येक आमदाराला शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे या बैठकीत सत्तास्थापनेबाबत सर्व आमदारांचं मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार ते पाहण गरजेचं आहे.

COMMENTS