शिवसेना आमदाराचा भाजप आमदारावर ब्लॅकमेलिंगचा आरोप !

शिवसेना आमदाराचा भाजप आमदारावर ब्लॅकमेलिंगचा आरोप !

नागपूर – शिवसेना आमदारानं भाजपच्या आमदारावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केला आहे. त्याचबरोबर बंब यांच्याविरोधात सर्व पक्षातील काही आमदारांनी अशाच प्रकारची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती आहे. यामध्ये काही भाजपच्या आमदारांनीही बंब यांच्यावर तक्रार केली आहे. भाजपचे आमदार मोहन फड यांनही प्रशांत बंब यांच्याविरोधात तक्रार केली आहे. इथे पक्षाचा विषय नाही, त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार बाहेर काढावा.  पण त्यांच्या तक्रारीमुळे अधिकारी काम करत नाहीत. केवळ चौकशी लावायची आणि ब्लॅकमेल करायचे काम प्रशांत बंब करत असल्याचं फड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात विविध मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांबाबत तक्रारी करून कामं थांबवण्याचे प्रकार प्रशांत बंब करत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. माजी अधिकाऱ्यांना हाताशी धरून माहिती मागवून तक्रारी करणं आणि आजी अधिकारी, कंत्राटदारांवर आरोप करून काम बंद पडण्याची त्यांची स्ट्रॅटेजी असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय शिसाट यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रशांत बंब यांनी इतर आमदारांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये. तसेच बंब यांच्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाहीत त्यामुळे विकासकांमांना खीळ बसली असल्याचं आमदार शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमदारांच्या या तक्रारीमुळे प्रशांत बंब यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS