पोलिसाकडून माझ्यावर अन्याय, न्याय मिळाला नाही तर राजीनामा देणार, विधानसभेत शिवसेना आमदाराचा इशारा !

पोलिसाकडून माझ्यावर अन्याय, न्याय मिळाला नाही तर राजीनामा देणार, विधानसभेत शिवसेना आमदाराचा इशारा !

नागपूर – पोलिसाकडून माझ्यावर अन्याय झाला असून मला न्याय मिळाला नाही तर राजीनामा देण्याचा इशारा विधानसभेत शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. ज्योतिप्रिया सिंग या पोलीस अधिकाऱ्यानी माझ्यासह माझ्या 15 कार्यकर्त्यांना 15 दिवस जेलमध्ये टाकले होते असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. सार्वजनिक मिरवणुकीत विनयभंग केला असल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांनी माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी खोटे आरोप केले असल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी अशा अनेक तक्रारी ज्योतिप्रिया सिंग यांच्याविरोधात असून मी हक्कभंग दिला, हक्कभंग समितीच्या सुनावणीत साक्षीदाराला समितीसमोर धमकी देण्यात आली. त्यामुळे मला न्याय दिला नाही तर मी सदस्याचा राजीनामा देईन असा इशाराही राजे क्षीरसागर यांनी दिला आहे.

दरम्यान पोलिसांकडून आमदारांचा वारंवार अवमान केला जात आहे. तसेच त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलले जाते असून या सभागृहाच्या 288 आमदारांमार्फत विनंती आहे की तुम्ही आमच्या हक्कांचे रक्षण करा अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे ज्या ज्या आमदारांवर अन्याय झाला, ज्यांना अधिकार्‍यांनी शिविगाळ केली आहे त्यांचे म्हणणे तुम्ही ऐकून घ्या अशी मागणीही यावेळी प्रभू यांनी केली आहे.

 

COMMENTS