आमच्या घरावरुन जाणा-या विमानांचाही त्रास होतो, मग विमानं बद करायची का? – अनिल परब

आमच्या घरावरुन जाणा-या विमानांचाही त्रास होतो, मग विमानं बद करायची का? – अनिल परब

मुंबई – शिवतीर्थावरील सभांना आक्षेप घेणा-यांचा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवाजी पार्कवर सभा घेतल्यास तेथील लोक कोर्टात जातात. मग आमच्या घरावरुन विमानं जातात, त्याचा आम्हालाही त्रास होतो, झोप येत नाही, मग विमानं बंद करायची का?, असा सवाल विधानपरिषदेत बोलत असताना अनिल परब यांनी केला आहे. तसेच दादरमधील शिवाजी पार्कात सभा घेतली, तर स्थानिक लोक कोर्टात जातात. रात्री दहानंतर झोपायचं असतं, काही डेसिबल आवाज होतो म्हणून ते गुन्हे दाखल करतात. त्यामुळे गेली पाच वर्षांपासून माझ्यावर खटला चालू असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी मुंबई सोन्याची कोंबडी आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याला मुंबईच प्रेम आहे? कोंबडी कापायची आणि निघून जायचं असा सवालही परब यांनी केला आहे. तसेच मी मुंबईच्या प्रदूषणाची माहिती घेतली. मुंबईत रात्री दोन वाजता पण सरासरी 72 डेसिबल आवाज होतो. माझ्या घरावरुन दररोज विमानं जातात, दिवसा 138 डेसिबल आवाज होतो, पहाटे तीन वाजता 154 डेसिबल आवाज होतो. त्यामुळे मला झोप येत नाही, मला झोपायचा हक्क नाही का? त्यांच्याविरोधात मी कोर्टात जातो, तर कोणी याचिका दाखल करुन घेत नाही. याबाबत सरकारने भूमिका घ्यावी. तसेच सभांमुळे ध्वनी प्रदूषण होतं, मग विमानांमुळे होत नाही का? मग विमान पण बंद करा, अशी उपरोधिक टीकाही यावेळी अनिल परब यांनी केली आहे.

COMMENTS