शिवसेना आमदाराचा राजीनामा, भाजपकडून लोकसभेच्या मैदानात !

शिवसेना आमदाराचा राजीनामा, भाजपकडून लोकसभेच्या मैदानात !

नांदेड  – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारानं राजीनामा दिला आहे. नांदेडमधील शिवसेनेचे  विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते भाजपच्या तिकीटावर नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. चिखलीकर  यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्याविरोधात चिखलीकर यांचा सामना रंगणार आहे.

दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची गेली अनेक दिवसांपासून भाजपशी जवळीक आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केली होती. तसंच मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकींमध्येही चिखलीकर कायम हजर राहत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नांदेड पालिकेत कामगिरीनंतर चिखलीकरांचं जाहीर कौतुक केलं होतं. त्यामुळे भाजपशी असलेली त्यांची जवळीकता कामी आली असून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS