राष्ट्रवादीच्या नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या आमदाराचा राजीनामा!

राष्ट्रवादीच्या नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या आमदाराचा राजीनामा!

करमाळा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसला असून शिवसेनेचे करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नारायण पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना करमाळ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच पाटील चांगलेच नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे करमाळ्यात शिवसेनेला धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान दरम्यान मला एबी फॉर्म मिळत असतानाही सावंतांच्या खेळीमुळे माझी उमेदवारी कापली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित होती. परंतु त्यांची उमेदवारी ऐनवेळी कापूली आहे. जलसंधारणमंत्री सावंत यांनी पक्षप्रमुखांकडे बांगल यांना तिकीट देण्याची गळ घातली होती. त्यामुळे पाटील यांच्यासह मतदारसंघातील सर्वच शिवसैनिक नाराज आहेत. याच नाराजीवरु त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

COMMENTS