शिवसेनेला धक्का, निवडणुकीच्या तोंडावर आमदाराचा राजीनामा!

शिवसेनेला धक्का, निवडणुकीच्या तोंडावर आमदाराचा राजीनामा!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा
दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे धानोरकर यांनी राजीनामा दिला आहे. बाळू धानोरकर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

downloadfile

दरम्यान धानोरकर यांनी शिवसेनेच्या पदांचाही राजीनामा
दिला आहे. उद्धव ठाकरेंकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसचे लोक संपर्कात होते पण पुढे काही झाले नाही. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचीही माझी तयारी आहे. निवडणूक लढवायची असल्याने मी माझ्या पदाचे राजीनामे दिले असल्याचं धानोरकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS