“शिवसेनेचा आमदार असताना मंत्रीपदासाठी भाजपच्या दारात जाणे यावरुन तुमची परिपक्वता दिसते !”

“शिवसेनेचा आमदार असताना मंत्रीपदासाठी भाजपच्या दारात जाणे यावरुन तुमची परिपक्वता दिसते !”

मुंबई– शिवसेनेचा आमदार होऊन मंत्रीपदासाठी भाजप, मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणे यावरून तुमची परिपक्वता दिसते. तसेच सेनेचा आमदार असून सेनेच्याच जिल्हाध्यक्षाला निवडणुकीत पाडणे यावरून तुमची पक्षनिष्ठाही सिद्ध होत असं जोरदार प्रत्युत्तर युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांना पत्रकाद्वारे दिले आहे.तसेच मला बालिश म्हटलं म्हणजे तुम्ही स्वत: परिपक्व झालात असे होत नाही, ज्यांना प्रगल्भ व प्रगल्ब यातला अर्थ कळत नाही, त्यांनी परिपक्वतेच्या गप्पा मारू नयेत असंही पाटणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान “काल परवा राष्ट्रवादीचा हल्लाबोल पाटणला झाला, हल्लाबोल करतय कोण तर ज्यांनी सत्तर हजार कोटींवर डल्ला मारला. यातील काहींनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. पाटणकर पितापुत्र मातब्बरांना जेवढे मतदारांचा बुध्दीभेद करायला आणतील, त्याच पटीने माझे मताधिक्‍य वाढेल’ अशी टीका साता-यातील शिवसेचे आमदार शंभूराज देसाई यांनी केली होती. त्यानंतर पाटणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली आहे.

दरम्यान यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात तुम्ही धूर काढला व त्यानंतर तुम्हाला समज द्यायची वेळ आली ही तुमची परिपक्वता आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. गतवर्षी तुमच्या कर्तृत्वाने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटनाला 500 रूपये दर कमी मिळाला. त्यामुळे 8 कोटी 60 लाख रूपयांचे नुकसान झाले ते कसे भरून देणार? असा सवालही त्यांनी केला आहे.  तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत केलेले आरोप व प्रश्नावर तोंड उघडा असे मी संसदपट्टू आ. देसाई यांना जाहीर आव्हान दिले होते. मात्र त्याचे उत्तर ते देवूच शकत नाहीत, एवढी त्यांची महान कर्तबगारी आहे. अजितदादा मित्र, देवेंद्र फडणवीस दोस्त, अहो तुमची ही मैत्री त्यांनी स्विकारलीही असती मात्र त्यासाठी कर्तृत्व व पक्षनिष्ठाही असावी लागते अशी जोरदार टीकाही पाटणकर यांनी यावेळी केली आहे.

 

COMMENTS