शिवसेनेच्या आमदाराचे बंधू भाजपच्या वाटेवर, शिवसेनेच्याच खासदाराला शह देणार ?

शिवसेनेच्या आमदाराचे बंधू भाजपच्या वाटेवर, शिवसेनेच्याच खासदाराला शह देणार ?

उस्मानाबाद – परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचे बंधु प्रतापसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून ते उस्मानाबाद लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला येमगरवाडी (ता. तुळजापूर) येथे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डानमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सध्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड हे खासदार आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

COMMENTS