कोकणात शिवसेना, मनसे आणि भाजपला राणेंचा दणका !

कोकणात शिवसेना, मनसे आणि भाजपला राणेंचा दणका !

चिपळूण – कोकणात शिवसेना, मनसे आणि भाजपला मोठा धक्का बसला असून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूणचा दौरा केला आहे.यादरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुक्यातील लोटे व पंधरागाव विभागातील शिवसेना आणि मनसे, मार्गताम्हाणे येथील शिवसेना, तर गुहागरमधील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिका-यांच्या प्रवेशामुळे कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना, मनसे आणि भाजपला याठिकाणी मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS