“बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना !”

“बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना !”

मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत ठाकरे हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. एक पत्रकार ते शिवसेना प्रमुख असा वादळी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सिनेमाच्या शेवटी To Be Continued… अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजेच ठाकरे -2 येणार हे नक्की मानलं जात आहे. हाच संदर्भ घेत मनसैनिकांच्या मनातील ठाकरे-2 चा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओसाठी जे गाणं वापरण्यात आलं आहे तेही ठाकरे सिनेमातलंच असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमधून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा संदेश देण्यात आला आहे. तसंच व्हिडीओच्या प्रत्येक फ्रेममध्ये बाळासाहेबांचा फोटो व या फोटोशी साधर्म्य असणारा राज यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. याचाच गर्भित अर्थ हा की उद्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरे अशी मनसैनिकांची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी स्क्रीनिंगसाठी आपल्याला बसायला योग्य जागा मिळाली नाही असं सांगत त्यांनी थिएटर सोडलं होतं. त्यातून मनसे आणि शिवसेना पुन्हा समोरासमोर आले आहेत. आता ठाकरे-2 नावाने व्हायरल होणारा हा व्हिडीओही याच वादाचे पडसाद असल्याचं दिसत आहे.

COMMENTS